अर्जित रजा सुधारित शासन निर्णय : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करणे बाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून एक महत्वपुर्ण शासन निर्णय ( Shasan Nirnay ) दि.04.05.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
दि.24.05.2019 नुसार दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / निधन झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाऱ्या परिगणनेसाठी ग्राह्य धरावयाच्या वेतनाच्या अनुषंगाने तसेच अर्जित रजा रोखीकरणाच्या कार्यवाहीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये दि.01.01.2016 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त किंवा शासन सेवेत असतानाच निधन पावलेल्या / होणाऱ्या प्रकरणी , खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे . अशाच कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या परिगणनेसाठी वेतन या संज्ञेचा अर्थ हा मुळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहे .
अर्जित रजा देय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेवून त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममुल्य रोख रक्कम एका ठोक रक्कमेत रोखीने प्रदान करण्याचे आदेश सदर निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत . तसेच सबंधित कर्मचारी दि.01 जानेवारी 2016 ते दि.31.01.2019 या कालावधीमध्ये असुधारित वेतन संरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममुल्याची रक्कम यापुर्वी अदा केलेली असल्यास त्यांना सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम ठोक रक्कमेद्वारे रोखीने प्रदान करण्याचे आदेश देखिल देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात अर्जित रजा सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबतचा सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .