महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अर्जित रजा रोखीकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित रजेचे रोखीकरण करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रक हा राज्याचे उपसचिव पो.द. देशमुख यांच्याकडून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आलेला आहे .यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय असतात .
या संदर्भात जिल्हा परिषद बीडकडून शासन निर्णय दिनांक 06.12.2022 नुसार जिल्हा प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा केव्हापासून अनुज्ञेय करावे , तसेच अनेक जिल्हा परिषद शिक्षकांकडून सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापुर्वीच्या अर्जित रजांच्या रोखीकरणची मागणी करण्यात येत आहे .याकरीता शासनाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे .
यानुसार सर्व जिल्हा परिषदांना असे कळविण्यात येत कि , बिड जिल्हा परिषदेने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने उपरोक्त नमुद दिनांक 06.12.2022 रोजीच्या शासन निर्णयात अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे , यासाठी सदर GR MADHR सुधारणा करण्याची बाबत राज्य शासनाच्या स्तरावर विचार आहे . यास्तव पुढील आदेश होईल पर्यंत शासन निर्णय दिनांक 06.12.2022 ची अंमलबजावणी करण्यात येवू नये आदेश आदेश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !
- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका बाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित !
- माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार ह्या सुविधा !