Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Arjit raja Rokhikaran paripatrak ] : कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 30 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता संचानलायस्तरावरुन मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) , जि.प.बुलडाणा व अधिक्षक , वेतन व भ.नि.नि पथक ( प्राथमिक ) जि.बुलडाणा यांनी केलेल्या विनंतीनुसार , सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 नियम 16 मधील 18 ब नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पुर्ण वर्षाकरीता 15 दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे . खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच नियम 19 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा अथवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्यापकाला / कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकारी पुर्वपरवानगी मिळवावी लागेल , असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच प्राथमिक शिक्षक / मुख्यापकांना दिनांक 01 जुलै 1995 नुसार अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य केलेली आहे .
तथापी सदरच्या आदेशांमध्ये अर्धवेतनी रजा ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमुद करण्यात आलेले आहेत .. या बाबत प्राथमिक शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांच्या मार्फत दिनांक 30 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.