Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Arjit Leave New Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अर्जित रेजेचे रोखीकरणे हे सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत , राज्या शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 04.05.2022 मधील परिच्छेद क्र.02 नंतर नमुद करण्यात आलेला परिच्छेद हे पुढीलप्रमाणे वाचण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयान्वये राज्य शासन सेवेतील खाजगी शाळांमधील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली सन 1981 नियम 16 मधील पोटनियम क्र.18 अ व 19 येथे नमुद कर्मचाऱ्यांनाच रजा रोखीकरण लागू असणार आहेत .
नियम 18 अ जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक व्यतिरिक्त ( यांमध्ये उप मुख्याध्यापकसहीत ) एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षांमध्ये पुर्ण मोठ्या सुट्यांचा अथवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर त्याबाद्दल त्या कर्मचाऱ्यांना पुर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या सेख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस ( 30 ) दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर संख्या ऐवढे अर्जित रजा अनुज्ञेय असणार आहेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे .
तसेच नियम 29 ज्याला पोटी नियम 18 च्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणताही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती जर 300 दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजा वेतना इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असणार आहेत . या निर्णयांमुळे राज्य शानांचे वरील नमुद करण्यात आलेला परिच्छेद क्र.03 वगळण्यात येत आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..