पवित्र पोर्टद्वारे शिक्षक पदभरतीकरीता मान्यता ; शासन निर्णय निर्गमित दि.14.01.2025

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Approval for teacher recruitment through Pavitra Port ] : पवित्र पोर्टद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील नमुद बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

यांमध्ये Anthology International Pvt. Ltd या संस्थेशी आयुक्त कार्यालयाने एक वर्ष कालावधीचा केलेला करार , Anthology International Pvt. Ltd या संस्थेने पुर्ण केलेल्या 20 टक्के कामकाजाच्या अनुषंगाने 18,58,500/- इतका खर्च मंजूर करण्यात आलेला आहे .

तसेच Talisma corporation Private Ltd. या संस्थेने पुर्ण केलेल्या 80 टक्के कामकाजाच्या अनुषंगाने रुपये 55,75,500/- इतका खर्च मंजूर करण्यात येत आहे . तसेच पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी Talisma corporation Private Ltd. या संस्थेस एक वर्षे अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 02 प्रकारातील किमान एक जाहीरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

त्याप्रमाणे याकरीताचा खर्च रुपये 68,84,120/- रुपये इतका खर्चास मान्यता देण्यात येत आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment