Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कर्मचाऱ्यांचे पती / पत्नी , मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) मृत्युपूर्वी कायदेशिररित्या दत्तक घेतलेला मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) तसेच दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्यांची सून पात्र ठरेल . तसेच घटस्फोटित मुलगी किंवा बहिण , परित्यक्ता मुलगी किंवा बहिण , विधवा मुलगी किंवा बहिण तसेच केवळ दिवंगत अविवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण पात्र ठरेल .

अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता : अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र नातेवाईकाची शैक्षणिक अर्हता व निम्न वयोमर्यादेनुसार त्याला गट क किंवा गट ड मधील पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणर आहे . तर गट क मधील लिपिक टंकलेखक या पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नियुक्ती दिनांकापासून 6 महिने असलेली मुदत वाढवून 2 वर्षे इतर करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : NPS मधील जमा रक्कम,भविष्य निर्वाह निधी (GPF) खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत , वित्त विभागांकडून शासन परिपत्रक निर्गमित !

अनुकंपा नियुक्ती हा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा वारसा हक्क असणार नाही  : मा. सर्वौच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्णयानूसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती हा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा वारसा हक्क होत नाही तसेच विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहत नाही असे सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सा.प्र.विभागांकडून दिनांक.21.09.2017 रोजी निर्गमित करण्यात आलेला अनुकंपा बाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावेत ..

अनुकंपा नियुकी शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्धनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुप जॉईन करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *