Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ annasaheb patil loan scheme ] : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत रुपये 15 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता लाभार्थी हा इतर कोणत्याही महामंडळ मार्फत कर्ज घेतला नसावा , तसेच ज्या जाती / गट करीता कोणतेही महामंडळ कार्यरत नसतील अश्या जाती / गटातील उमेदवार हे सदर योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यास पात्र असतील . दि.01.01.2019 पासुन सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता कमाल वय हे पुरषांकरीता 50 तर महिलांकरीता 55 वर्षे इतके असेल .

सदर लाभार्थ्याचे उत्पन्न हे शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्य नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असणे आवश्यक असेल ( सध्या 8 लाख रुपयांच्या मर्यादेत ) . तसेच सदर योजना अंतर्गत एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस लाभ घेता येतो . तसेच सदर योजना अंतर्गत लाभार्थ्यांने राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सीबीएस प्रणाली युक्त बँकेमार्फत कर्ज घेणे आवश्यक असेल .

तसेच सदर योजना अंतर्गत दिव्यांग करीता 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो , तर दिव्यांग लाभार्थी हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असेल  .तर सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता कर्ज उचलल्यापासुन 5 वर्षे करीता / प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल , त्या करीता लागु असेल .

कर्ज सुविधा : सदर योजना अंतर्गत आपणांस किमान 3 लाख रुपये ते 15 लाख रुपये मर्यादेत 12 टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , सदर योजना अंतर्गत आपणांस 5 वर्षे मुदतीत कर्जाचे हप्ते नियमित परतफेड केल्यास , आपणांसह व्याजाची रक्कम ही आपल्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा केली जाते .

अर्ज करण्याची पद्धत : सदर योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आपण www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली संपुर्ण माहिती भरुन सविस्तर आवेदन सादर करु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *