Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ anandacha shidha vitaran shasan nirnay ] : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी – गणपती उत्सवा निमित्त प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत , राज्य शासनांच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 12 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यामधील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिपत्रिका धारक तसेच छ.संभाजीनगर व अमरावती विभाग मधील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषावरील केशरी शेतकरी अशा एकुण 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवा निमित्त वितरीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहेत .

यांमध्ये गौरी – गणपती उत्सवा निमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात चनादाळ , रवा , साखर व 1 लिटर सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा वाटपास मान्यता देण्यात येत आहे  . सदर शिधाजिन्नस दिनांक दि.15 ऑगस्ट 2024 ते दिनांक 15 सप्टेंबर 2024 या 01 महिन्याच्या कालावधीत ई – पॉस प्रणालीद्वारे 100/- रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

तसेच सदर आनंदाचा शिधा वितरीत करण्याकरीता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांऐवजी 08 दिवसांच्या कालावधीमध्ये सदर निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

सदर आनंदाचा शिधा मुळे राज्यातील नागरिकांना सणा-सुदीच्या काळांमध्ये मोठा दिलासा प्राप्त होणार आहे . या संदर्भातील अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *