Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ajit pawar speak about state employees payment ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री अजितदादा पवार यांनी चिंताजनक वक्तव्य केली आहे . यामुळे सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत , या संदर्भातील सविस्तर वक्तव्य पुढील प्रमाणे जाणून घेऊया .
अजित पवार म्हणाले की सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनावर होणारा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात असून , एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात खाजगी क्षेत्रातील तीन – तीन कर्मचारी काम करू शकतील , असा चिंताजनक वक्तव्य केले आहे . या वक्तव्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
या वक्तव्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून , आमदार यांच्या वेतन व पेन्शन बाबतचा तपशील प्रसारित करण्यात येत आहे . यामध्ये राज्यात सध्या 288 विधानसभा आमदार आहेत . तर 78 विधान परिषद आमदार आहेत . यांना प्रत्येकी प्रतिमहा दोन लाख 50 हजार रुपये वेतन दिले जाते , तर राज्यात एकूण 775 माजी आमदार यांना पन्नास हजार ते एक लाख रुपयांची मासिक पेन्शन दिली जाते .
यांचा हिशोब लावला असता 12 ते 15 कोटी शासकीय तिजोरीतून दिले जाते . या खर्चामध्ये राज्यात अडीच हजार पेक्षा अधिक कुशल कामगार आनंदाने काम करतील असे प्रत्युत्तर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे . त्याचबरोबर आमदार व खासदार यांच्या सभा , बैठका इत्यादी कारणास्तव मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असतो . सदर अनावश्यक खर्चावर आळा बसवून रोजगार निर्मिती करण्यात यावी , अशी कर्मचाऱ्यांकडून मागणी आहे .
सद्य स्थितीमध्ये पाहिले असता सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत , सदर रिक्त पदांचा कामाचा बोजा विद्यमान कर्मचाऱ्यांवर आहे . यामुळे सरकारी कर्मचारी अधिक जबाबदारी घेऊन काम करीत आहेत . त्यांच्या बाबतीत असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे .