लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे माहे जुलै 2023 पासून डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ताचा (DA Rate) दर हा 46% पार जाणार आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्षांतुन दोनदा ( माहे जानेवारी 2023 व जुलै 2023 ) ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) च्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढ करण्यात येते .माहे जानेवारी महिन्यांतील AICPIC निर्देशांकाचा विचार केला असता 132.8 टक्केवर होता तर यांमध्ये वाढ होवून फेब्रुवारी 2023 मध्ये 132.7 , तर माहे मार्च 2023 मध्ये 133.3 टक्के तर माहे एप्रिल 2023 मध्ये AICPIC चा निर्देशांक हा 134.2 वर होता .
तर आता माहे मे महिन्यातील आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये आणखीण मोठी वाढ होणार आहे .कामगार मंत्रालयकडून काल रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माहे मे महिन्याचा AICPI निर्देशांका हा 134.7 असा आहे म्हणजेच एप्रिल महिन्यातील आकडेवारीमध्ये 0.5 पाईंट वाढ झालेली आहे .
जानेवारी ते मे महिन्यातील आकडेवारींचा विचार केला असता , ग्राहक निर्देशांकामध्ये एकुण 1.9 पॉईंट म्हणजेच महागाई भत्तांमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे . काल माहे मे महिन्यातील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाल्याने , कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये आणखीण 4 टक्के वाढीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे .
शिवाय जागतिक महागाई च्या वाढीमुळे महागाईचे निर्देशांकामध्ये देखिल मोठी वाढ झालेली आहे .माहे जानेवारी 2023 मध्ये महागाई चा निर्देशांक हा 43.08 होता , तर माहे मे मध्ये महागाईचा निर्देशांक हा 45.56 पाँईट एवढा आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2023 मधील डी.ए वाढीमध्ये पुन्हा एकदा चार टक्के वाढ होणार आहे , ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए 46 टक्के पार जाणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !