Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agricultural Land Purchase Loan Scheme ] : लहान त्याचबरोबर मध्यम शेतकऱ्यांकरीता शेतजमीन खरेदी करण्यासाठी बँक मार्फत कर्जे उपलब्ध करुन दिले जातात , यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँक मार्फत सुलभ पद्धतीने लवकर कर्जे उपलब्ध करुन दिले जातात .या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
योजनेच मुख्य उद्देश : लहान तसेच मध्यम शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी सुलभ व लवकर मुदत कर्जे उपलब्ध करुन देणे हा मुख्य उद्देश आहे .
या योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता : या योजनेच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी उमेदवार हे लहान किरकोळ शेतकरी ज्याची जमीन ही 5 एकर पेक्षा कमी ( यांमध्ये कोरडवाहु जमीन ) अथवा 2.5 एकर सिंचत जमीन असणारे शेतकरी या योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेवू शकतात . त्याचबरोबर 2.5 एकर सिंचित असणारी जमीन किंवा 5 एकर जमीनीस भाडेतत्वावर घेण्यात आलेले शेतकरी / शेतमजुर कर्ज घेण्यास पात्र ठरतील .
तसेच शेतीविषयक पार्श्वभुमी असणारे उद्योजक देखिल या योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेण्यास पात्र ठरतील , यांमध्ये राज्य सरकारच्या कायद्यांनी सदर उद्योजकांना शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी देण्यात आलेले आहे .
मिळणारी कर्ज रक्कम / व्याजदर : या कर्ज योजनेच्या माध्यमातुन शाखेद्वारे शेतजमीनीचे मुल्यांकनाद्वारे कर्ज उपलब्ध करुन दिले जाते , यांमध्ये विक्री कर स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क जास्तीत जास्त 20.00 लाख रुपये इतकी आहे . तर यांमध्ये 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर 1 वर्षे MCLR + BSS @ 0.50% + 2.00% इतका व्याजदर आकारण्यात येईल तर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर 1 वर्षे MCLR + BSS @ 0.50% + 3.00% इतका व्याजदर आकारण्यात येईल . तर सदर कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 7 ते 10 वर्षे यांमध्ये कर्जाची परतफेड ही अर्धवार्षिक / वार्षिक पद्धतीने करता येईल .
आवश्यक असणारे कागदपत्रे : सदर योजनांच्या माध्यमातुन कर्ज सुविधा घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी अर्ज नं. 138 , बिन्झर बी 2 , 7/12 , 8 अ , 6 डी अर्क , अर्जदाराचे चतु : सिमा , इतर कोणत्याही वित्तीय संस्था / बँका कडे थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र , कायदेशिर जमीन गहान पत्र , हमी फॉर्म इ.
लाभ कसा घ्याल : सदर योजनांच्या माध्यमातुन शेतजमीन खरेदी करण्यासाठी आपल्या नजिकच्या बँक ऑफ महाराष्ट्र शोखस भेट देवून लाभ घेणेबाबत प्रस्ताव सादर करुन शकता ..