Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agri Product commodity trading in stock] : आपणांस माहितच असेल कि , ज्या प्रमाणे कंपनीच्या शेअर बाजार याप्रमाणे कृषी प्रोडक्ट देखिल खरेदी -विक्री ट्रेडिंग करु शकतो  . कृषी प्रोडक्टमध्ये सर्वच कृषी धान्य यांचा समावेश होत नाहीत , तर काही धान्य / तेल / मसाले यांचा समावेश होतो . जे कि आपणांस त्यांचे शेअर विकत घेता येते , व आपल्या मनानुसार विक्री देखिल करता येते .

कमोडिटी मार्केट : कमोडिटी मार्केटींमध्ये म्हणजे ज्यांमध्ये गुंतवणुक दार हे मौल्यवान धान्य , मसाले तसेच धातु , उर्जा , कच्च तेल अशा वस्तुंचा व्यापार ( ट्रेडिंग ) करतात , त्यास कमोडिटी मार्केट असे म्हणतात  कमोडिटी वस्तुंचे साधारण पणे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येते , तर यापैकी आपल्या देशांमध्ये केवळ दोनच प्रकारच्या वस्तुंचा वापर केला जातो .

01.यामध्ये कृषी अथवा सॉफ्ट वस्तु यांचा समावेश आहे , जसे कि काळी मिरी , जिरे , हळद , लाल मिरची , धणे , तसेच मसाले सोया बिया , मेंथा तेल , गहू हरभरा , सोयाबिन अशा कृषी व सॉफ्ट वस्तुंचा समावेश होतो .

02.तर बिगर कृषी / कठोर वस्तुंमध्ये ॲल्युमिनियम , कच्चे तेल , नैसर्गिक वायु , तसेच सोने , चांदी , तांबे , जस्त , निकेल अशा माल्यवान धातुंचा समावेश होतो .

इक्विटी मार्केट आणि कमोडिटी मार्केट मध्ये मुख्य फरक म्हणजे इक्विटी मार्केट मध्ये सुचिबद्ध करण्यात आलेल्या कंपन्यांच्या शेअरर्सची खरेदी – विक्री करण्यात येत असते , तर  कमोडिटी मार्केट मध्ये कच्चा माल ( धान्य / मसाले / धातु ) यांची विक्री – खरेदी केली जाते . यांमध्ये कमोडिटी धारकांस ऑप्शन असे म्हटले जाते तर इिक्विटी धारकांस शेअर धारक असे म्हटले जाते . इक्विटी मध्ये शेअरधारकांस लाभांश दिले जाते तर कमोडिटी मध्ये लाभांशाची तरतुद नाही .

कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग कशी करावी ? : कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी प्रथम आपल्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक असेल त्यात NCDEX खाते ब्रोकर कडून ओपन करुन घेणे आवश्यक असेल , तरच आपण कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करु शकतो ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *