Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ agree department best government scheme ] : राज्य शासनांच्या कृषी विभागांकडून सुरु असणाऱ्या विद्यमान कल्याणकारी शासकीय योजना बाबत , महाराष्ट्र शासनांच्या राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

पंतप्रधान पीक विमा योजना ( PM Crop Insurance ) :  शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांच्या प्रिमियम रक्कमेवर केंद्र शासनांकडून पिक विमा कवच दिले जाते , सदर विमा हप्ता हा केंद्र शासनांकडून भरला जातो . यांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी , अवकाळी पाऊस तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे जमीन ही नापेर राहील्यास , त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांन सदर विमा योजना अंतर्गत विमा संरक्ष्ज्ञण दिले जाते .

कृषी यांत्रिकीकरण : शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने तसेच आधुनिक यंत्रणांचा वापर करुन शेती करण्यास सहाय्य करण्यासाठी कृषी यंत्रसामुग्री यांमध्ये ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर सोबत चालणरी औजारे , सिंचन सेट , पॉली हाऊस , कांदाचाळ , शेडनेट इ. गोष्टींसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर आवेदन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

कीड रोग्य सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प : राज्यात सर्वाधिक पेरणी करण्यात येणारे पिक सोयाबीन , हरभरा , कापूस , ज्वारी , ऊस , मका या प्रमुख पिकांवर वारंवार त्याचबरोबर आकस्मिकरीत्या पडणारे कीड रोगांचे प्रादुर्भावांपासुन शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनांकडून पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहेत , या माध्यमातुन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करुन कीड रोगांचे वेळीच व्यवस्थापन करण्यात येते .

याशिवाय फलोत्पादन यांत्रिकीरण , प्रधानमंत्री कृषी संचन योजना , एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान , काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्प उभारणी , शेतकरी मासिक , राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , सामुहिक शेततळे , कांदाचाळ उभारणी , आत्मनिर्भर , महाडीबीडी , राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान ,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *