Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Advance Increament shasan Paripatrak ] : आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ राज्य शासनांच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन आदेशान्वये दिली जाते . परंतु सदर शासन आदेशाची कार्यवाही करण्यास अनेकवेळा विलंब होतो , परंतु प्रहार शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनांकडून आगाऊ वेतनवाढ लागु करणेबाबत दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
श्री.महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अमरावती विभागीय कार्यालय यांना आंतरजिल्हा बदलीने अमरावती विभागीतील यवतमाळ , बुलडाणा , वाशिम , अमरावती , अकोला जिल्ह्यात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत निवेदन देण्यात आलेले होते . सदर पत्राचा संदर्भ घेवून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे .
सदर परिपत्रकानुसार आंतरजिल्हा बदलीने अमरावती विभागातील यवतमाळ , बुलडाणा , वाशिम , अमरावती , अकोला जिल्ह्यात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबतचे संदर्भिय निवेदन प्राप्त झालेले असून , सदरच्या प्रकारणांमध्ये सदर संदर्भिय पत्रातील मुद्यांच्या अनुषंगाने संदर्भिय निवेदनासोबत जोडलेल्या शासन आदेश दि.03 ऑक्टोंबर 2003 मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही नियमानुसार करण्याचे निर्देश आलेले आहेत .
तसेच केलेल्या कार्यवाहीचा प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांना कळविण्याचे निर्देश उप आयुक्त ( आस्थापना ) अमरावती विभाग , अमरावती यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती / अकोला / यवतमान / बुलढाणा / वाशिम यांना निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भात विभागीय आयुक्त अमरावती यांच्या वतीने दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.