Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : आदिवासी दुर्गम भागात काम करतांना माध्यमिक शिक्षक या संवर्गास एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची ( माध्यमिक मुख्याध्यापक पदाची ) वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती होणेबाबत , आदिवासी विकास आयुक्तालय , नाशिक मार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेचे दिनांक 12.03.2024 च्या निवेदनाद्वारे आदिवासी दुर्गम भागात काम करतांना माध्यमिक शिक्षक संवर्गास एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची म्हणजे माध्यमिक मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती होणेबाबत , मागणी करण्यात आली आहे .
या संदर्भात मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण , मुंबई खंडपीठ नागपुर येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 719/2017 प्रकरणी मा.न्यायधिकरणाने दिनांक 24.04.2023 नुसार न्यायनिर्णय दिलेला आहे . सदर न्याय निर्णयाबाबत मा.उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याबाबतचा अपर आयुक्त नागपुर कार्यालयाकडून प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला होता , सदर प्रकरणी शासनाने शासन पत्र क्रमांक न्यायाप्र.1723 दिनांक 22.11.2023 नुसार जर स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्यात आलेला असून ..
अपिल दाखल करणे संयुक्तिक ठरणार नाही असे अभिप्राय दिलेले आहेत . सदर पत्रात आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी / अधिकारी यांना त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देणेबाबत अभिप्राय दिलेला आहे .
या संदर्भात सा.प्र.विभाग शासन परिपत्रक दि.29.02.2024 नुसार आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत , स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .
या संदर्भात आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक मार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.