Aditya-L1 Mission ; भारत आता मिशन आदित्य द्वारे सूर्यावर संशोधनसाठी यान सज्ज!

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर, संगिता पवार : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून आदित्य मिशन एल 1 जो की अंतराळावर संशोधनासाठी लवकर जाणार आहे .काही दिवसांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये चंद्रयान 3 सक्सेसफुल झालेला आहे आणि इस्रो आता आदित्य एल 1 मशीन अंतराळावर संशोधनासाठी लवकर जाणार आहे.

आपल्या भारत देशाकडून मंगळयान आणि चंद्रयान हे सक्सेसफुल झालेली आहे आता इस्रो सूर्यावर आपला यान लवकरात लवकर नेणार आहे. तर चला जाणून घेऊया की सूर्यावर नेमकी यान कशासाठी पाठवत आहे

सूर्यावर का पाठवत आहे यान : पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे सूर्य आहे .आपल्या भारत देशातील वैज्ञानिकांनी सूर्याचा अभ्यास करणे सुरू केलेला आहे. सूर्य आपला जवळचा ग्रह असल्याने त्याचा अभ्यास करणे सहज व सोपे होऊ शकते. सूर्य हा एक ऊर्जेचा स्त्रोत आहे आणि यामध्ये खूप सारे घटक समाविष्ट केलेले आहे, काही वेळेस सूर्यामध्ये ऊर्जेचे स्फोट होतात या स्फोट मुळे आपल्या पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आता सूर्यावर यान पाठवणार आहे.

सूर्यामधील महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. हा यान कोरोनल हीटिंगमध्ये संशोधन करणार आहे या मोहिमेमुळे इस्रोला आपली जागतिक स्तरावर नाव लौकिक करण्याचा मोका मिळेल यामार्फत वातावरणाचा अभ्यास केला जाईल आणि या मोहिमेमुळे सूर्यापासून पृथ्वीचे रक्षण होऊ शकते.

Leave a Comment