Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Additional Pension Shasan Nirnay ] : 80 वर्षे व त्यावरील सेवानिवृत्तीवेतन धारकांना वयांनुसार 20% , 30% , 40% , 50% , 100% अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना माननिय न्यायमुर्ती पदनाभन समितीने शिफारस केलेले वेतन व भत्ते दिनांक 01 जानेवारी 2006 पासून लागु करण्याबाबतचा शासन निर्णय दि.05.01.2011 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये दिनांक 30.03.2011 नुसार सुधारणा करण्यात आली आहे .
सदरच्या निर्णयानुसार सेवा निवृत्त न्यायाधिश तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना वय वर्ष 80/85/90/100 सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच वय वर्षे 79/84/89/94/99 पुर्ण झाल्याच्या दिनांकानुतर लगेच 20% , 30% , 40% , 50% , 100% अतिरिक्त निवृत्तीवेतन लागु करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचे वयांनुसार अतिरिक्त निवृत्तीवेतनाचे फायदे पुढील चार्टप्रमाणे पाहु शकता ..
निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारक वय | अतिरिक्त निवृत्ती वेतनाचे लाभ ( टक्केवारी ) |
80 वर्षे ते 84 वर्षे पर्यंत | 20 टक्के अतिरिक्त वेतन |
85 वर्षे ते 89 वर्षे पर्यंत | 30 टक्के अतिरिक्त वेतन |
90 वर्षे ते 94 वर्षे पर्यंत | 40 टक्के अतिरिक्त वेतन |
95 वर्षे ते 99 वर्षे पर्यंत | 50 टक्के अतिरिक्त वेतन |
100 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय | 100 टक्के अतिरिक्त वेतन |
सविस्तर माहितीसाठी विधी व न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.