Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Additional Charge , Personel Payment , Special Pay Info. ] : एकाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांस आपल्या पदाच्या कामाव्यतिक्त इतर पदाचा कार्यभार दिला असेल , तर सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद नियम 56 नुसार करण्यात आलेली आहे .
यावेळी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांने आपल्या स्वत : च्या पदाचे काम सांभाळून अतिरिक्त पदाची जबाबदारी पार पाडत असल्यास अतिरिक्त वेतन घेण्यास पात्र ठरतो . अशा वेळी सदर अधिकारी कर्मचाऱ्यांस वित्त विभागाच्या दिनांक 01 जून 2015 नुसार स्वत : च्या पदाच्या 5 टक्के रक्कम विशेष वेतन म्हणून अदा करण्यात येते , यापुर्वी स्वत : च्या पदाच्या 5 टक्के अथवा 1500/- यापैकी किमान रक्कम अशी अट वरी नमुद निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे .
दिनांक 01 जुन 2016 पासून वित्त विभागाच्या दिनांक 01 जुन 2015 नुसार कर्मचाऱ्यांने अतिरिक्त कार्यभार घेतल्यास , स्वत : च्या पदाच्या 5 टक्के रक्कम विशेष वेतन म्हणून अनुज्ञेय असणार आहेत .
वैयक्तिक वेतन : जर कर्मचाऱ्याचे पद नष्ट झाले तर सदर कर्मचाऱ्यांस पदावनत करण्याची वेळ आली असता , वेतन पुर्नरचनेत त्याचे वेतन कमी होत असेल अशा प्रसंगी त्याचे कायम पदाचे वेतन व नविन वेनत यांमध्ये जो फरक असेल तो वैयक्तिक वेतन म्हणून ग्राह्य धरला जातो .
विशेष वेतन ( Special Pay ) : एखादा कर्मचारी हा इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक धोक्याचे मेहनीचे / जास्त जिकिरीचे काम करीत असल्यास , त्यास सदर कामाचा मोबादला म्हणून जी अधिकची रक्कम मंजूर करण्यात येते , त्यास विशेष वेतन असे म्हटले जाते . उदा . नक्षलग्रस्त , आदिवासी भाग तसेच अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष वेतन अदा करण्यात येते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.