आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ additional charge additional payment shasan nirnay ] : आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदांचा कार्यभार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद वित्त विभागाच्या दिनांक 23 मे 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे .

म.ना.सेवा ( वेतन ) नियम 1981 च्या नियम क्र.56 नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वत : च्या पदा व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास अशा दुसऱ्या पदाकरीता सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस संभाव्य वेतनाच्या ( मुळ वेतनाच्या ) 5 टक्के दराने अतिरिक्त / विशेष वेतनाची तरतुद आहे .

परंतु सदरचे अतिरिक्त वेतन / विशेष वेतन अदा करताना यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता ( HRA ) व इतर भत्यांचा विचार केला जात नाही . परंतु सदरचे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असेल ते पद हे मुख्य पदास ( कर्मचाऱ्यांने धारण केलेल्या पदास ) दुय्यम पद नसावेत , असे नमुद आहे .

तर कामात व जबाबदारामध्ये वाढ झालेली असावी असेही नमुद करण्यात आलेले आहेत . तर दुसरे पद हे स्वतंत्र असुन , त्यास स्वतंत्र अधिकारीकरीता असावेत , असे नमुद आहेत .

परंतु सदर अतिरिक्त कार्यभार 02 वर्षापेक्षा पुढे सुरु ठेवायचे असेल , अशा प्रकरणी राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या वित्त विभागची पुर्वानुमती घेणे आवश्यक असेल . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली नमुद लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment