Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Addition Charges Shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 05 सप्टेंबर 2018 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार अतिरिक्त कार्यभार कोणास देण्यात यावा या संदर्भात मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , म.नागरी सेवा नियम 1981 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या स्वत : च्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या इतर पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येतो . असा हा दुसऱ्या रिक्त असणाऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय विभाग अंतर्गत , प्रशासकीय सोय व निकल लक्षात घेवून शक्यतो त्याच कार्यालयातील , त्याच संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ , अनुभवी व कार्यक्षम अधिकारी / कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात यावा असे निर्देश आहेत .

तसेच जेथे असे अधिकारी / कर्मचारी उपलब्ध नसतील तेथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच काही बाबींमुळे सर्वात ज्येष्ठ अधिकारी / कर्मचारी यांना डावलून नंतरच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार द्यावयाचा असेल तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कार्यभारासाठी का अपात्र आहे त्याची लेखी कारणे अभिटिप्पणीत नमुद करण्याचे निर्देश आहेत .

तसेच अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेलया अधिकारी / कर्मचारी त्याच्या मुळ पदाच्या कर्तव्य व जबाबदारीसह , त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार सोपवलेल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची संबंधितांना खातरजमा करण्याचे निर्देश आहेत .

तसेच विभागीय चौकशी सुरु असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्याच्या स्वत : च्या विभागीय चौकशीवर प्रभाव पडण्याची वा विभागीय चौकशीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता असल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येवू नयेत असे निर्देश आहेत .

तसेच अतिरिक्त कार्यभार दिलेल्या रिक्त पद तातडीने भरण्याची कार्यवाही संबंधित प्रशासकीय विभागाने करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच याबाबत अतिरिक्त वेतन / विशेष वेतन देण्याबाबत वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या शासन आदेशानुसार प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी असे निर्देश आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *