Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Action against late come in govt. office ] : कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता यापुढे मोठा फटका बसणार आहे , या संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .
केंद्र शासनांकडून आता सरकारी कार्यालयांमध्ये अद्यावत प्रणाली आणली आहे , यांमध्ये कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी लावण्यात आलेली आहे . तर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहेत . शिवाय काही भागांमध्ये ऑनलाईन प्रणालीवर आधारीत बायोमेट्रिक हजेरी असणार आहे , म्हणजेच सदर हजेरी वरिष्ठ कार्यालयांशी नेट कनेक्ट द्वारे कनेक्ट असणार आहे .
केंद्र सरकारकडून आता शासकीय कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे . कार्यालयांमध्ये नेहमीच उशिरा येणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना वेळेपुर्वीच लगाम लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे . केंद्र शासनांकडून आदेश निर्गमित करत कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकिद देण्यात आलेली आहे .
उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत , केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून उपस्थितीसाठी आता मोबाईल फोन आधारित असणारे फेस ऑथेंटिकेशन सिस्टीम वापरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . ज्यामुळे उपस्थितीकरीता होणाऱ्या गैरवापरास आळा बसणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर फेस ऑथेंटिकेशन सिस्टीमध्ये लाईव्ह लोकेशन डिकेक्शन व जियो टॅगिंग या प्रकारच्या आधुनिक यंत्रणांचा वापर होणार आहे .यांमध्ये आधार सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली वापर करण्यात आलेला आहे . ज्यांमध्ये कर्मचारी हजेरी साठी अधिक पारदर्शकता येणार असल्याचे मनुष्यबळ मंत्रालयांकडून नमुद करण्यात आले आहेत .
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची रजा लावण्याचे निर्देश आहेत , तर महिन्यातुन 2 वेळा अशा प्रकारची चुक झाल्यास एक दिवसाची रजा कापण्याचे निर्देश आहेत . तर उशिरा येण्यास उचित कारण असेल तरच अशा प्रकारची रजा कापली जाईल .अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत .
कार्यालयांमधून लवकरच जाणाऱ्यांवर होणार कारवाई : ज्याप्रमाणे कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , त्याचबरोबर कार्यालयांमधून कार्यालयीन वेळेच्या अगोदरच जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखिल कारवाईचे निर्देश आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.