Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ acharsanhita period employee notice , photo viral ] : आचार संहिता काळांमध्ये राजकिय नेत्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने , सदर कर्मचाऱ्यांस आचार संहिता भंग केलेबाबत , नोटिस प्राप्त झालेली आहे . नेमके प्रकरण काय आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

विधानसभा निवडणूका 2024 अंतर्गत लागु करण्यात आलेली आचारसंहिता काळांमध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा अथवा कोणत्याही पक्षाचा प्रचार करणे अथवा त्यांचा सत्कार शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून करणे हा आचार संहितेचा भंग आहे .

दि.19 ऑक्टोंबर 2024 रोजी नांदेड येथे एका राष्ट्रीय पक्ष्याच्या कार्यक्रमांमध्ये खासदार व आमदार यांना शुभेच्छा देत असताना श्री.रुस्तुम दासु राठोड ( सह शिक्षक ) यांचा फोटो व्हायरल झाला आहे . सदर राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदार यांना शुभेच्छा दिल्याने आचार संहितेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तरी आचार संहिता भंग केल्याने सदर कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई का अनुसरण्यात येवू नयेत , याबाबतचा  खुलासा दिनांक 21.10.2024 रोजी समक्ष हजर राहून सादर करण्याचे निर्देश दिले गेले होते .

सदरचा खुलासा हा समाधानकारक असल्यास अथवा अप्राप्त असल्यास , सदर कर्मचाऱ्यांचे काही म्हणणे नाही , असे समजून सदर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश आहेत .

यामुळे सदर कालावधीमध्ये , कर्मचाऱ्यांने आचार संहिता काळांमध्ये आचारसंहितेचा भंग होईल असे कृत्य करु नयेत ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *