Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ aachaar sanhita rules for government employee ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 करिता दिनांक 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे . या काळामध्ये सर्वसामान्य जनता तसेच राजकीय नेते , सरकारी कर्मचारी यांच्यासाठी काही नियमावली घालून देण्यात आलेली आहे .  सदर नियमावलीची उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाते .

आचारसंहिता काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास , त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही तसेच नोकरीवर देखिल गदा येवू शकतो . कारण सरकारी कर्मचारी हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण भाग असून , प्रशासन चालवत असताना काही विशिष्ट पक्षांना निवडणुकीत फायदा होईल , अशा प्रकारचे कृत्य / वागणे करू नयेत अथवा त्यांच्यावर कार्यवाही केली जाते .

आजचे युग हे आधुनिक युग असल्याने , या काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक उपयोग केला जातो . यामध्ये सरकारी कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात . सोशल मीडियाचा वापर करीत असताना , कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विशिष्ट पक्ष / नेते यांचा प्रचार प्रसार होईल अशा प्रकारचे कृत्य करू नयेत .

यामध्ये व्हाट्सअप वर एखाद्या पक्ष / नेते यांची DP लावणे , स्टेटस ठेवणे , व्हाट्सअप ग्रुप मध्ये निवडणूक प्रचाराचे पोस्ट शेअर करणे अथवा अन्य सोशल मीडियावर राजकीय घडामोडी शेअर करणे , तसेच एखाद्या राजकीय नेत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणे हे आचारसंहिता नियमाचे उल्लंघन समजण्यात येते .

त्याचबरोबर एखाद्या राजकीय कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांने सहभाग घेऊ नये तसेच अशा कार्यक्रमांमध्ये भाषण देण्यास , सक्त मनाई आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असणार आहे , अन्यथा कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *