Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ A very important government circular regarding amendment of set recognition ] : सन 2024-25 ची संच मान्यता दुरुस्ती करणे , संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालय, पुणे मार्फत दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत , प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . तरी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्व यांना सदर प्रणालीवर तात्काळ माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामध्ये माहिती भरत असताना शिक्षक-शिक्षकेतर पदांची संच मान्यता करिता मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत . याशिवाय चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर शिफ्टिंग ऑफ पोस्ट त्याचबरोबर उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे , तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्ग खोल्यांची अचूक माहिती भरणे , याशिवाय मुख्याध्यापक यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 विद्यार्थी तुकडे निहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यता करिता तपासून फॉरवर्ड करावी . व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या फेरीफाय करून संच मान्यता करिता फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचनालय यांच्यामार्फत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक / माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आलेली आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *