Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ prime minister internship scheme detail ] : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रतिमहा 5000/- रुपये विद्यावेतन अदा केले जाणार आहेत , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

सदर योजनेचे नाव हे पीएम इंटर्नशिप योजना अशी आहे , सदर योजनेची सुरुवात ही दिनांक 03 ऑक्टोंबर रोजी करण्यात आली आहे , तसेच राज्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतची अर्थसंकल्पांमध्ये घोषणा देखिल केली होती . सदर योजना अंतर्गत पुढील 5 वर्षात देशातील तब्बल 1 कोटी सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी / निमशासकीय / शासकीय कंपन्यांमध्ये इंटरशिप दिली जाणार आहे .

ज्यांमध्ये इंटर्नला दरमहा 5000/- रुपये इतके विद्यावेतन अदा केले जाणार आहेत , ज्यांमध्ये 4500/- रुपये हे भारत सरकारकडून तर 500/- रुपये हे संबंधित कंपन्यांकडून देण्यात येणार आहेत .

या योजना अंतर्गत वय वर्षे 21-24 वर्षे असणारे उमेदवार सदर योजना अंतर्गत पात्र ठरतील , तसेच त्यांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावेत . सदर योजना अंतर्गत दिनांक 26 पर्यंत उमेदवारांची यादी निवड केली जाईल , तर दिनांक 27 नोव्हेंबर पासून कंपन्यांची निवड अंतिम केली जाईल . सदर इंटरशिप ही दिनांक 02.12.2024 पासून ते पुढील 12 महिन्यांकरीता सुरु राहणार आहे .

नोंदणी प्रक्रिया : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 पर्यंत www.pminternship.mca या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता . महाराष्ट्र , तेलंगणा , गुजरात , उत्तराखंड या राज्याकरीता 111 कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *