Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Samagra shiksha abhiyan kantrati employee kayam seva nirnay ] : राज्यातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत , राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर निर्णय हा दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .ज्यांमध्ये समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत राज्यातील तब्बल 3105 विशेष शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .
कंत्राटी पद्धतीने सदर दिव्यांग विभागात 20 वर्षे सेवा पुर्ण झाली आहे , अशा कंत्राटी तत्वावरील 3105 विशेष शिक्षकांना सदर निर्णयामुळे सेवा ह्या कायम झाले असून , त्याकरीता पद मंजूरी करीता मंजूरी दिली आहे . याकरीता सन 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पदनिर्मितीचे आदेश देण्यात आलेले होते .
सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा याकरीता , औसा ( लातुर जिल्हा ) विधानसभेचे आमदार अभिमन्यु पवार व गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्या केल्याबद्दल विशेश शिक्षकांचे समन्वयक विजय ठोकणे ( गोंदिया ) यांनी आभार मानले आहे .
सदर निर्णयामुळे 3105 विशेष शिक्षकांना न्याय मिळाले आहे ,त्यांच्या सेवा ह्या कायम झाले असून , पदनिर्मितीला देखिल मान्यता देण्यात आली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.