Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Yevale Amrutatulya Franchise see detail ] : येवले अमृततुल्य चहाची फ्रेंचाईजी घेवून व्यवसाय करुन महिना चांगली कमाई करु शकता . सदर चहाची फ्रेंचाईजी घेण्यासाठी किती रुपयांचा खर्च येतो , त्याकरीता कोणत्या बाबींची तरतुद आवश्यक आहे , याबाबत सविस्तर माहिती घेवूयात .

चहाचा व्यवसाय हा कोणत्याही ठिकाणी चालतो , यांमध्ये राज्यात येवले चहा अधिक लोकप्रिय झालेला आहे , यामुळे येवले चहा दिसल्यास ,लोकं आवडीने चहा पिण्यासाठी येतात . यामुळे आपण सदर चहाची फ्रेंचाईजी घेतल्यास , अधिक फायदेशिर ठरणार आहे .

सदर येवले अमृततुल्य चहाची फेंचायजी घ्यायची असल्यास आपल्याकडे 100-200 स्क्वेअर फुट इतकी जागा असणे आवश्यक असेल . ज्यांमध्ये सदर फ्रेंचायचीने ठरवून दिलेल्या बाबींनुसार आऊटलेट उभा राहू शकते . याकरीता एफएसएसएआय मार्फत मंजुरीचे कागदपत्रे येवले अमृततुल्य मार्फत ट्रेडमार्कची मान्यता त्याचबरोबर इतर आवश्यक कागदपत्रे ( आधार कार्ड , पॅन कार्ड ) द्यावी लागेल .त्यानंतर आपण सदर फ्रेंचायचीचे मालक म्हणून मंजूरी दिली जाईल .

फ्रेंचायची साठी येणारा खर्च : याकरीता आपणांस आवश्यक बाबीकरीता 10-15 लाख रुपये ( शहरी भागांमध्ये ) खर्च येईल , ज्यांमध्ये आपणांस फेंचायसी शुक्ल म्हणून 150,000/- + 18 टक्के GST तर विपणन शुल्क 1,50,000/- रुपये + 18 टक्के GST तर पायाभूत सुविधा करीता 5-6  लाख रुपये खर्च येवू शकेल .

सदर फ्रेंचाईजी घेण्याकरीता प्रक्रिया : सदर येवले चहाची फ्रेंचाइजी घेण्याकरीता आपणांस ऑनलाईन आवेदन करता येतो , त्याप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने कात्रज पुणे येथील कार्यालय क्र.101, 1 ला मजला सिल्व्हर बिल्डिंग कात्रज कोंढवा रोड विश्व जिमजवळ कात्रज पुणे या पत्यावर संपर्क साधू शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *