दि.04.10.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले 03 महत्वपुर्ण निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay about state employee dated 04 October ] : काल दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 03 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .

7 वा वेतन आयोग प्रमाणे व्यवसायरोध भत्ता : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगा प्रमाणे सुधारित व्यवसायरोध भत्ता देण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली . यांमध्ये आरोग्य सेवा मधील गट – अ संवर्गातील अधिकारी ( एस -20 ) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणी , दंतशल्यचिकित्सक गट ब- ( एस – 20 ) तसेच दंतशल्यचिकित्सक विशेषज्ञ संवर्ग ( एस – 23 ) यांना 7 व्या वेतन आयोग प्रमाणे .दिनांक 01.01.2019 पासुन 35 टक्के सुधारित दराने व्यवसायरोध भत्ता लागु करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

गोखले संस्था , डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना : पुणे येथील गोखले संस्था , डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 02 लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना यांमध्ये सन 2016 नंतर निवड झालेल्या शिक्षकेत्तर पदांकरीता 02 लाभांची ( 12 व 24 वर्षे ) अशी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना : नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेत्तर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत्‍ 02 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .सदर लाभ हे दिनांक 01.04.2010 , 05.07.2010 व 06.09.2014 रोजीच्या निर्णयनुसार पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment