Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election new update ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट सूत्रानुसार समोर येत आहे . महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तारखा दिनांक 13 ऑक्टोबर नंतरच घोषणा होण्याची शक्यता समोर येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 08 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीर , हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे . तर पुढील 02 दिवसानंतर सदर राज्याच्या निवडणूक कार्यक्रम संपेल , त्यानंतरच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल . याकरिता 13 ऑक्टोबर नंतरच तारखा जाहीर होतील असा अंदाज आहे .
आचारसंहिता कधी लागणार : सदर माहितीनुसार राज्याची नवीन विधानसभा दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येईल . त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता आहे . निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर मोठ्या हालचाली सुरू होताना दिसून येत आहेत .
प्रत्यक्ष मतदान : राज्य विधानसभा निवडणुकीकरीता प्रत्यक्ष मतदान दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे , याकरिता आवश्यक मनुष्यबळ केंद्राकडून पुरवला जाईल .
मंत्रालय स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत चार दिवसातच दोनपेक्षा अधिक बैठका संपन्न झालेले आहेत . विद्यमान सरकारकडून निवडणुकीच्या अगोदरच नागरिकांना खुश करण्याकरिता विविध निर्णय घेतले जात आहेत . दिनांक 20 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 283 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून , 27 सप्टेंबर रोजी 231 शासन निर्णय निर्गमित करण्यात आली आहेत .