Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ namo shetakari mahasanman nidhi yojana 5 th installment ] : राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचवा हप्ता ( माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 ) करीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दि.30 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आता पर्यंत 4 हप्ते अदा करण्यात आले आहेत , आता सदर योजना अंतर्गत पाचवा हप्ता अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे . सदरच्या निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापुर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करणेकामी …
रुपये 2254.96/- कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तसेच सदरची निधी ही सन 2024-25 करीता मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर सदर निधी ही 2401 – पीक संवर्धन , 115 लहान / समान्त शेतकऱ्यांची व शेतमजुरांची योजना , नमो शेतकरी निधी योजना , राज्य योजना , अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
सदर निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 5 वा हप्त्याची रक्कम विधानसभा निवडणूकीच्या आचार संहिता लागण्यापुर्वीच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . सदर निधी हा आयुक्त कृषी यांच्या नियंत्रणाखाली वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .