Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay about state employee ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रींमंडळ बैठकीत 07 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . सविस्तर कर्मचारी संदर्भातील कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात ..
निवृत्ती उपदान , मृत्यु उपदानांच्या रक्कम वाढ : राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान , मृत्यु उपदानांच्या कमाल रक्कमेत 14 लाख रुपये वरुन केंद्र सरकार प्रमाणे 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे .सदर निर्णयाची अंमलबजावणी ही दि.01.09.2024 पासुन करण्यात येणार आहे .
होमगार्ड भत्यांमध्ये मोठी वाढ : राज्यात पोलिस प्रशासनांसाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . सध्य स्थिती होमगार्ड यांना 570/- रुपये दररोज कर्तव्य भत्ता दिला जातो , आता 1083/- रुपये इतका करण्यात आला आहे . याशिवाय 200/- रुपये उपहार भत्ता , 180/- कवायत भत्ता , भोजन भत्ता 250/- तर खिसा भत्ता 100/- अशी सुधारित वाढ केल्याने राज्यातील 40 हजार होमगार्ड यांना लाभ मिळणार आहे .
अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता खंड क्षमापित : राज्य शासन सेवेतील अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता 01 दिवसांचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला अहो . दि.21.12.2019 रोजीच्या निर्णयानुसार , अधिसंख्य पदांवरील अधिकारी – कर्मचाऱ्यांकरीता 11 महिन्यांच्या सेवेच्या नंतर 01 दिवसांचा तांत्रिक खंड सेवा निवृत्ती तसेच सेवेविषय लाभाकरीता क्षमापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर लाभ : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत दि.01.11.2005 रोजी अथवा त्या नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना तसेच त्या अनुषंगिक लाभ लागु करण्यास मान्यता देण्यात आली आहे , या निर्णयामुळे 10,693 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे .
विशेष शिक्षकांची पदे : राज्यांमध्ये आता विशेष शिक्षकांची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे . यानुसार आता केंद्राच्या स्तरावर 01 या प्रमाणे 4,890 पदे हे विशेष शिक्षकांकरीता रोखून ठेवण्यास मान्यता दिली आहे .
कोतवाल व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ : राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे , आता कोतवालांना 15,000/- प्रति महा मानधन दिले जाणार आहेत . तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8000/- रुपये इतके मानधन दिले जाणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.