Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana 18th installment good news ] : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते अदा करण्यात आले आहेत . तर 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी हस्तांतरित केले जाणार आहेत , या संदर्भात कृषी व किसान कल्याण मंत्रालयामार्फत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
सदर माहितीनुसार देशातील 09 करोड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना अठरावा हप्ता दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे . याकरिता केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाकडून वेगाने कामकाज सुरू आहे .
सदर योजनेअंतर्गत पात्र 09 करोड शेतकऱ्यांना अठरावा हप्ता अंतर्गत दोन हजार रुपयाची सन्मान निधी थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे . यामुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे . सदर अठरावा हप्ता विधानसभा निवडणुका पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे .
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच संपन्न होणार असल्याने , सरकारकडून विविध योजना अंतर्गत जनतेला अधिकाधिक लाभ दिले जात आहेत . ज्यामुळे येत्या निवडणूक मध्ये विद्यमान सरकारला फायदा होण्याची अपेक्षा आहे .
काल दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध केल्यानुसार , देशाचे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते देशातील 09 करोड प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत .
सदर अठरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांची ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे . अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत . अथवा ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही , अशांना सदर योजने अंतर्गत 18 वा हप्ता दिला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .