लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन संदर्भात विविध राज्य सरकारकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहेत . आता सरकारकडून २५ वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर पुणै पेन्शनचा लाभ त्याचबरोबर १० टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ देखिल अनुज्ञेय करणेबाबत सरकारकडून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय नसून राज्यस्थान राज्य सरकारने पेन्शनबाबतचा हा मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रीमंडळ बैठक अयोजित करण्यात आलेले होते , सदर बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .राजस्थान नागरी सेवा नियम 1996 मध्ये सुधारणा करुन सदर सुधारित तरतुदीस सदर बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .
ज्या राज्य कर्मचाऱ्यांना 25 वर्षे सेवा पुर्ण झालेली आहे अशा राज्यस्थान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुर्ण पेन्शन / निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे . यापुर्वी ही अट 28 वर्षे पुर्ण झाल्यानंतर पुर्ण पेन्शनचा लाभ मिळत होती , आता यांमध्ये तीन वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे .त्याचबरोबर ज्या पेन्शनधारकांचे वय हे 75 वर्षे पर्ण झाले आहेत अशा पेन्शनधारक / त्यांच्या कुटुंबाना 10 टक्के इतके अतिरिक्त पेन्शनचा लाभ्ज्ञ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन ! NPS पेन्शन योजनेत सुधारणा !
सध्या महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे , यांमध्ये राजस्थान राज्य सरकारप्रमाणे पेन्शन लाभ अनुज्ञेय करु शकतील . 1982-83 च्या जुनी पेन्शनच्या नियमानुसार पुर्ण पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान 20 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक आहे . परंतु आता यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे , नुकतेचे अभ्यास समितीकडून पेन्शन संदर्भातील अहवाल राज्य शासनास सादर करण्यात आलेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !