Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee dcpc pension transfer to nps scheme ] : राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) पेन्शन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील अनुदानित विमुक्त जाती , विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा / निवासीशाळा तसेच इतर मागासवर्ग त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा मधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर झालेली आहे . अशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली होती . अशा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( NPS ) लागू करण्यात येत आहे .
सदर पेन्शन योजना केवळ नियमित तसेच मान्यताप्राप्त पदावर नियुक्त शिक्षक शिक्षण तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे . यामध्ये कंत्राटी तत्वावरील अथवा रोजंदारी अशा पद्धतीतील नियुक्ती वरील पदांना लागू करण्यात येणार नाही . सदर कर्मचारी नियमित पदावर आहे की नाही, या संदर्भातील खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची असणार आहे .
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असून देखील सदर योजनेअंतर्गत दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी थेट NPS प्रणालीमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत . सदर शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिता सदर शासन निर्णयामध्ये कार्यपद्धतीच्या अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
यामुळे वरील नमूद शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केल्याने , निवृत्तीनंतर अंशदान निवृत्ती वेतन योजनेपेक्षा अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे . यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती संदर्भातील GR पुढील प्रमाणे पाहू शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.