Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ kalpanik vetanvadh shasan nirnay gr ] : कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या अथवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या दि.01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , मार्गदर्शक सुचना वित्त विभागांने निर्गमित केलेल्या आहेत .

सदर सुचना ह्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी प्रकारच्या आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन त्याचबरोबर उसतोड कामगारांच्या मुला – मुलींकरीता असणाऱ्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदरच्या शासन परिपत्रकानुसार , राज्यातील बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा , विद्यानिकेतन त्याचबरोबर उसतोड कामगारांच्या मुला – मुलींकरीता असणाऱ्या निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर ( Teacher / Non Teaching Staff ) कर्मचाऱ्यांना लगतच्या…

 दि.01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , विभागांच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयांनी संदर्भाधिन परिपत्रकातील सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *