Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ havy rain falls damage crops anudan gr ] :अतिवृष्टीमुळे माह जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी देणे संदर्भात राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाकडून दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
पूर ,चक्रीवादळ ,अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतामधील पिकांची नुकसान झाले असल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे , याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत दिली जाते . सदर शासन निर्णय नुसार राज्यातील जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाकरिता शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर केलेली आहे .
सदर निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या बाधित शेतकऱ्यांना एकूण रूपये 23707.13 लक्ष ( अक्षरी – रुपये दोनशे सदतीस कोटी सात लक्ष 13 हजार फक्त ) इतकी रक्कम वितरित करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे . सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा निहाय बाधित क्षेत्र तसेच बाधित शेतकऱ्यांची संख्या व वितरित करण्यात आलेली निधीच्या तपशील नमूद करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार जिराईत पिके तसेच बागायत पिके व बहुवार्षिक पिकांची नुकसानी करिता मदतीची विविध दराप्रमाणे जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे , याकरिता लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तसेच मदत निधीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयामुळे जून 2024 ते ऑगस्ट 2024 या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे येणार आहेत . यामध्ये गडचिरोली , वर्धा , चंद्रपूर , नागपूर, पुणे , सातारा , सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ ,बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांकरिता मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता पुढील लिंकवर क्लिक करावेत .. शासन निर्णय ( GR )