Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवा ,भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा मधील सर्व अधिकारी , त्याचबरोबर राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या माहे जून 2023 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिनांक 19 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रानुसार , महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतना इतकी रक्कम माहे जून 2023 च्या वेतनातून वसूल करण्यात यावे असे आव्हान करण्यात आले आहेत .

यानुसार राज्यातील सर्व शासकीय ,निमशासकीय ,महामंडळे, स्वायत्त संस्था मध्ये कार्यरत सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यासाठी राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ , NPS योजनेत सुधारणा !

सदर शासन निर्णयानुसार एक दिवसाचे वेतन कपात करत असताना मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ,सदर शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी बँक खातेचा संपूर्ण तपशील नमूद करण्यात आलेला आहे . यानुसार शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतन वाटप करत असताना , त्यांच्याकडून वसूल करावयाच्या वेतना इतके रकमेचे प्रमाणपत्र तयार करण्याचे सूचना विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेले आहेत.

त्याचबरोबर एक दिवसाचे वेतन कपात करत असताना , कर्मचाऱ्यांचे अनुमती पत्र सदर शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे . एक दिवसाचे वेतन कपात करणे संदर्भात राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

वेतन कपात शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *