Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update upto 29 sept. Andaj ] : परतीच्या पावसाचा जोर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे . परतीचा पाऊस राज्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .

आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील भंडारा ,नागपूर, वर्धा ,अमरावती त्याचबरोबर मराठवाडा विभागातील हिंगोली ,लातूर, नांदेड ,धाराशिव ,बीड तसेच पुणे, सोलापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे . यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

दिनांक 23 व 24 सप्टेंबर : दिनांक 23 व 24 सप्टेंबर रोजी विदर्भ विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे . या काळात मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

दिनांक 26 ते 29 सप्टेंबर : दिनांक 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यातील मुंबई उपनगर , मुंबई शहर  ,नाशिक , पालघर , अहमदनगर , जळगाव  ,धुळे  ,छत्रपती संभाजी , नगर , बुलढाणा जालना, वाशिम , अमरावती ,वर्धा ,नागपूर ,अकोला ,गोंदिया , भंडारा , नागपूर या जिल्ह्यामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

28 व 29 सप्टेंबर : दिनांक 28 व 29 सप्टेंबरला राज्यात ठाणे, मुंबई , रत्नागिरी , रायगड , पालघर या जिल्ह्यामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर कालावधीमध्ये नद्यांना पूर येण्याची संभावना व्यक्त करण्यात आलेली आहे . सदर पावसामुळे खरीप पिक काढणीवर  विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *