Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai bhatta 3% vadh cabinet nirnay ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जुलै 2024 पासून आणखीन 3% ची वाढ लागू करणे संदर्भात महत्वपूर्ण निर्णय येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे .
महागाई भत्तामध्ये 3% ची वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै 2024 पासून तीन टक्के वाढ लागू करण्यात येणार आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के भरून 53% इतका होणार आहे . सदर महागाई भत्ता वाढ हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI )आधारे ठरविण्यात येतो .
माहे जानेवारी ते जून महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI ) नुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना DA मधील तीन टक्के वाढ निश्चित करण्यात आलेली आहे . यामुळे माहे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता , DA थकबाकीसह पुढील महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येईल .
दिनांक 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय : केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे . सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ( DA ) मधील वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल .यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत वाढीव तीन टक्के (3%) महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होईल .
केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ देणे संदर्भात निर्णय तात्काळ घेतला जाईल , ज्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेंशनधारकांना महागाई भत्ता दि.01 जुलै 2024 पासुन DA थकबाकी सह मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.