Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update upto Sunday] : राज्यामध्ये गणेश विसर्जनानंतर पावसाने विश्रांती घेतली , परंतु आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . राज्यात उद्यापासून पुढील तीन ( 03 ) दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

म्हणजेच दिनांक 20 , 21 व 22 सप्टेंबर रोजी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . कोणत्या  तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे ,  या संदर्भातील सविस्तर तीन दिवसांचा अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

दिनांक 20 सप्टेंबर वार , शुक्रवार : उद्या दिनांक 20 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी राज्यातील मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . त्याचबरोबर राज्यातील जळगाव , मध्य महाराष्ट्रातील नांदेड , हिंगोली , परभणी , जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

दिनांक 21 सप्टेंबर , वार शनिवार : दिनांक 21 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये विदर्भात पाऊस अधिक सक्रिय असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे . त्याचबरोबर या दिवशी मराठवाडा तसेच अहमदनगर , सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

दिनांक 22 सप्टेंबर , वार रविवार : या दिवशी राज्यातील विदर्भातील काही ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर या दिवशी राज्यात उर्वरित ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *