Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ aple sarkar seva Kendra Shasan Nirnay ] : राज्यातील ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारी विविध दाखले सेवा त्याचबरोबर प्रशासकीय विभागांच्या सेवा ऑनलाइन स्वरूपात मिळावे . त्याचबरोबर बँकिंग सेवा तसेच इतर व्यावसायिक सेवा यादेखील ग्रामीण पातळीवर एका छताखाली उपलब्ध करण्याकरिता राज्य सरकारकडून आपले सरकार सेवा सुविधा केंद्र सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे .

सदर सुविधा प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी , याकरिता एक वर्षाच्या कालावधीकरिता रेल टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व आई टी आई लिमिटेड या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पासाठी कंनझ्यूमेबल प्रशिक्षण सहाय्य व व्यवस्थापन इत्यादी करिता प्रति केंद्र प्रतिमहा रक्कम 2935/- रूपये इतकी कर इतकी रक्कम रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व आई टी आई लिमिटेड यांना प्रचलित संगणक प्रणाली द्वारे अदा करण्यात येणार आहे .

राज्य शासनाच्या सदर शासन निर्णयानुसार आता ग्रामीण पातळीवर जनतेला विविध ऑनलाइन सुविधा यामध्ये प्रशासकीय विविध दाखले तसेच बँकिंग सुविधा तसेच व्यावसायिक सुविधा उपलब्ध होणार आहेत . यामुळे ग्रामीण पातळीवरील जनतेला सदर दाखले काढण्याकरिता तहसील कार्यालय अथवा वरिष्ठ  कार्यालयामध्ये जाण्याचे आवश्यकता भासणार नाही .

तसेच राज्यामध्ये अनेक ठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्याने , सदर आपले सेवा केंद्राच्या मार्फत बँकिंग सुविधा यामध्ये पैसे काढणे , पैसे भरणे अशा प्रकारची सुविधा ग्रामीण पातळीवरच उपलब्ध होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *