Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kapus & soyabean anudan process ] : सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कमाल 10 हजार कमाल मर्यादेत अनुदान प्राप्ती साठी अर्ज कशा पद्धतीने सादर करायचे आहेत , याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये घेवूयात .
राज्य शासनांने शासन निर्णय जाहीर करुन मागील वर्षांमध्ये नैसर्गिक कारणांने सोयाबीन व कापुसच्या उत्पादनांमध्ये मोठी घट झाली , याचा तोटा शेतकऱ्यांना भोगावा लागला . यामुळे अशा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य राज्य शासनांकडून जाहीर करण्यात आलेली आहे . याकरीता कश्या पद्धतीने अर्ज करावा , याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता होती .
सदर सोयाबीन व कापुसाला मागील वर्षी हमी भागापेक्षा कमी बाजारभाव मिळाल्याने , अशा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखिल भागु शकला नाही . यामुळे विरोधी पक्षांकडून सदर पिक उत्पादकांना अनुदान दिले जावी अशी जोरदार मागणीनंतर , राज्य शासनांकडून सदर पिक उत्पादकांना 10 हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान जाहीर केले आहेत .
यांमध्ये प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान ( कमाल 2 हेक्टर – 10 हजार रुपये ) अनुदान देण्यात येईल तर ज्यांचे वीस गुंठ्यांपेक्षा कमी जमीन आहे , अशांना किमान 1000/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा अनुदान हे ई-पिक पाहणी ॲप्स वर अथवा पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत .
सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना संमती पत्र द्यावे लागणार आहेत , तर सामायिक खातेदाराला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत , सदर ना हरकत प्रमाणपत्र व संमतीपत्र हे कृषी सहाय्यकांकडे जमा करावे लागणार आहेत . याबाबत कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..