Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai Bhatta vadh news , aicpi ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन 3 टक्के महागाई भत्ता वाढ लागु होणार असल्याची मोठी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहेत . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे , डी.ए वाढ निश्चित केली जाते .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक माहे जुन 2024 पर्यंतची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ बाबत अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे . जुलै मधील डी.ए वाढीकरीता माहे जानेवारी ते जुलै महिन्यातील AICPI निर्देशांकाचा विचार केला जातो . महिन्यानिहाय निर्देशांक व अपेक्षित डी.ए वाढीची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहता येईल .
महिना | AICPI | अपेक्षित डी.ए वाढ |
जानेवारी | 138.9 | 50.84% |
फेब्रुवारी | 139.2 | 51.44% |
मार्च | 138.9 | 51.95% |
एप्रिल | 139.4 | 52.43% |
मे | 139.90 | 52.91% |
जुन | 141.4 | 53.44% |
माहे जुन महिन्याच्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डी.ए मध्ये 3 टक्के वाढ निश्चित झाली आहे . माहे मे महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 139.90 इतका होता , तर माहे जुन महिन्यात सदर निर्देशाकांत 1.5 अंकांची वाढ झाली असून जुन महिन्यात निर्देशांकाचा आकडा 141.4 अंकावर पोहोचला आहे .
यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 मधील 3 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै 2024 पासुन डी.ए चे दर 50 टक्के वरुन 53 टक्के असे सुधारित होणार आहेत .