सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत परिपत्रक जाहीर दि.29.07.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ zp Retire teachers 7 th pay commission remain installment & da arrears ] : सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांचे व केंद्रप्रमुख यांचे सातवा वेतन आयोग थकबाकी प्रलंबित राहीलेले तिसरा व पाचवा हप्ता व सेवानिवृत्त शिक्षकांचे महागाई भत्ता थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रक हे मा.शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 30 जानेवारी 2024 व दि.12.07.2024 रोजीच्या संदर्भाधिन पत्रांनुसार , जिल्हा परिषद अंतर्गत सेवा निवृत्तशिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे तिसरा , चौथा व पाचवा हप्ता तसेच महागाई भत्ता ही देयके ऑनलाईन शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करणे करीता अनुदान प्राप्त झालेले आहेत .

त्या अनुषंगाने प्रथम प्राध्यान्याने सेवा निवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे प्रलंबित तिसरा , चौथा , पाचवा हप्ते तसेच महागाई भत्ता थकबाकी देयके तयार करुन सदर देयके पंचायत समिती मधील लेखा विभागातुन तपासणी करुन सदर देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत पेंडीग बिल टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच त्या सोबतच सेवा निवृत्त शिक्षकांचे शालार्थ प्रणाली मध्ये खाते क्र. व आयएफसी कोड बरोबर असल्याबाबत , खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबतचे परिपत्रक पुढलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment