Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee invest in share market see rules ] : सरकारी कर्मचारी हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतात का ? असा प्रश्न वारंवार कर्मचाऱ्यांना पडत असतो , याबाबत नियमावली काय आहे ? याकरीता केंद्र शासनांकडून दिनांक 20 मार्च 2023 रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले होते .
सदरचे परिपत्रक हे देशातील सर्व केंद्र सरकारी कर्मचारी / राज्य सरकारी कर्मचारी / शासकीय अधिनस्थ मंडळ / संस्था मधील कर्मचाऱ्यांना सदर नियम लागु होईल असे नमुद करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकाची प्रत राज्यातील सर्व राज्य शासनांस सादर करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अवगत करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचारी हे अधिकृत्त ब्रोकर मार्फत शेअर मध्ये गुंतवणु करु शकतो . परंतु ट्रेडिंग करु शकत नाही . ट्रेडिंग म्हणजेच नफा कमवण्याच्या उद्देशाने शेअरची खरेदी -विक्री होय . सरकारी कर्मचारी केवळ गुंतवणुक करु शकतो . परंतु ट्रेडिंग केल्यास कार्यवाही होवू शकेल असे नमुद करण्यात आले आहेत .
ट्रेडिंग मध्ये Intraday , Future Option , Short Tearm buying Saleing in Delivery Trade अशा प्रकारची ट्रेडिंग सरकारी कर्मचारी कायद्यानुसार करु शकत नाही . त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांने एक वित्तीय वर्षात त्याच्या मुळ वेतनाच्या सहा पट पेक्षा अधिक रक्कम गुंतवणुक केली नसावी , केल्यास तसा रिपोर्ट कार्यालयास कळविणे आवश्यक असेल .
उदा – एकास 25,000/- रुपये इतके मुळे वेतन आहे , तर त्याने 25,000 X 6 = 150,000/- रुपयांपेक्षा अधिक रक्कम एका वित्तीय वर्षात गुंतवणु केली नसावी .
थोडक्यात सरकारी कर्मचारी शेअर मार्केट मध्ये डिलिव्हरी शेअर मध्ये गुंतवणुक करु शकतो , पण तेही लाँग टर्म साठी केले असावेत , शॉर्ट टर्म डिलिव्हरी शेअर देखिल बेकायदेशिर ठरते . म्हणजेच सरकारी कर्मचारी अधिकृत्त ब्रोकर मार्फत डिलिव्हरी मध्ये लाँग टर्मसाठी वरील मर्यादेत गुंतवणु करु शकतो .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.