ॲसिडीटी : पावसाळ्यात पोट गच्च होणे , गॅसेसचा त्रास होतोय का ? करा हे उपाय लगेच मिळेल आराम !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ gases problems solution ] : पावसाळ्यांमध्ये पोट गच्च होणे , गॅसेसचा त्रास होणे अशा कारणांमुळे ॲसिडीटी वाढण्याचे प्रमाण अधिक असते .यावर काही सोपे उपाय करुन या त्रासापासुन सुटकारा मिळवू शकता , असे सोपे उपाय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पावसाळ्यांमध्ये अपचन होण्याचे प्रमाणे अधिक असते , कारण पावसाळ्यांमध्ये हलके अन्नपदार्थ सेवण करणे अधिक सोईचे असते , जड अन्नपदार्थ जसे कि मांसाचे सेवण करणे अधिक जड असते . यामुळे पावसाळ्यात मांसाचे सेवण करणे टाळावेत . तर फक्त हलके पदार्थांचे सेवण करावेत .

पावसाळ्यांमध्ये ॲसिडीटी , पोट फुगणे तसेच अपचन सारखे त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चला अथवा आल्याचा काढा घेणे अत्यंत लाभदायक ठरते . याशिवाय जेवण झाल्याच्या नंतर काळजीने बडीशेप चावून खावेत , यामुळे पोट स्वच्छ होण्यास सहाय्यभूत ठरते . तसेच पोटाचे विकार देखिल कमी होण्यास मदत होते , तर दुसरा उपाय म्हणजे बडीशेपचा काढा जेवणानंतर प्यावेत , ज्यामुळे चांगला आराम मिळेल .

हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास , अशा प्रसंगी ०१ केळी खावी , ज्यामुळे बद्धकोष्ठतापासुन लगेच आराम मिळेल . जर आपणांस सतत जुलाब होत असल्यास पाणी गरम करुन त्यात लिंबू पिळून ते प्यावेत , अथवा दुध न घालता कोरी कॉपी त्यात लिंबू टाकून गरम असतानाच प्यावेत . ज्यामुळे आपल्याला लगेच आराम मिळेल .

जर पोट गच्च झाले असल्यास , मिरेपुड पाण्यात उकळून त्याचा काढा प्यावेत , ज्यामुळे चांगला आराम मिळेल . हे सर्व प्रकारचे घरगुती व सोपे उपाय आहेत .

Leave a Comment