Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teacher recruit in contract basis ] : राज्यांमध्ये स्थानिक डी.एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून समायोजन करणेबाबत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण निर्णय घेतला गेला आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्यात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन नजिकच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनांकडून घेण्यात आला होता . सदर निर्णयास नागरिक , कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात आल्याच्या नंतर , आता राज्य शासनांकडून स्थानिक डी.एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून समायोजन करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
नुकतेच शिक्षक भरती प्रक्रिया पुर्ण झालेली आहे , तरी देखिल राज्यात शिक्षकांची बरेच रिक्त पदे आहेत . तसेच ज्या शाळेमध्ये 15 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल अशा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याच्या नंतर रिक्त पदांचा आकडा वाढला आहे . तसेच डी.एड पात्रता धारक बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागणींकरीता राज्यांमध्ये जिल्हानिहाय आंदोलने करण्यात आले आहेत .
💁💁हे पण वाचा : गट ब & क संवर्गातील पदांसाठी मेगाभरती, लगेच करा आवेदन!
यामुळे राज्यात रिक्त असणाऱ्या जागी विशेषत : ज्या ठिकाणी कमी पट आहे , अशा शाळेवर कंत्राटी पद्धतीने स्थानिक डी.एड पात्रताधारक उमेदवारांची शिक्षण सेवक पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
दरमहा मिळेल इतके मानधन : सदर कंत्राटी शिक्षण सेवक या पदावर नियुक्त होणाऱ्यांना दरमहा 15,000/- रुपये मानधन अदा करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून देण्यात आला आहे .
या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक डी.ए बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.