Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme demand one day stike ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीकरीता एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत , सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे . .
सन 1982 ते 84 ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागु करणे व आपल्या हक्काच्या मागणीसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करीता सर्व विभागातील कर्मचारी बंधु व भंगिनी यांनी एक दिवसाची रजा घेवून एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे तर छ.संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहेत .
मागील अनेक वर्षांपासून दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि.1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करुन केली जात आहेत . मागील वर्षी नागपुर येथील राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन दिनांक 27.12.2022 रोजी दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनांच्या जुनी पेन्शन विषयक नकारात्मक धोरणांचा निषेध केला होता .
त्यानंतरच्या काळांमध्ये मार्च 2023 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुद संप करुन जुनी पेन्शनची मागणी केली होती . त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करुन तीन महिन्यात निर्णय घेवू असे आश्वासन केले होते . नुकतेच दिनांक 12 डिसेंबर 2023 ला नागपुर येथे विधानभवनावर 3 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला . त्यावेळी जुन्या पेन्शन समितीचा अहवाल प्राप्त झाला असून , जुनी पेन्शन लागु करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेवू असे आश्वासित केले होते .
जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीनुसार , GPS नावाची नविन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे . सदर योजनेचे स्वरुप हे राष्ट्रीय पेन्शन योजना सारखेच फसवे असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असून , त्यामुळे राज्यातील सर्व DCPS / NPS धारक यांचा निषेध करीत आहेत . जुनी पेन्शन योजना पुर्व लागु करण्याचा निर्णय न घेता शासन वारंवार DCPS / NPS व आता GPS सारख्या फसव्या योजना संबंधित कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर लादत आहे .
त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणा विषयक प्रचंड रोष निर्माण झाला आहे . राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करुन 18 वर्षाहून अधिक कालखंड झाला असून , आता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत . तरी काही सेवानिवृत्तीच्या अंबरठ्यावर आहेत . अशावेळी शासनांची DCPS व NPS योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पुर्ण अपयशी झाली आहे . त्यातून या नविन जीपीएस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत .
तरी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता , राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी या प्रमुख मागणी करीता दिनांक 03 ऑगस्ट 2024 रोजी वार शनिवार दुपारी 02 ते 05 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय , नाशिक या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.