लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ( 7 th Pay Commission ) थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्याच्या वेतन देयकासोबत देणे संदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
यामध्ये भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता व्याजासह GPF खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आली आहेत , तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता रोखीने जून महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता अदा करण्याचे आदेश निर्गमित झाले असले तरी ,राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा व तिसरा हप्ता निधी अभावी मिळाला नाही . यामुळे सातवा वेतन आयोगाचा चौथा / उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून करण्यात येणार आहे , जेणेकरून सातवा वेतन आयोगाचा हप्ता विहित कालावधीमध्ये अदा करण्यात येईल .
हे पण वाचा : गैरहजर कर्मचाऱ्यांवर वेळेत कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
कर्मचारी संघटनांची मागणीनुसार ज्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे पहिला , दुसरा ,तिसरा ( उर्वरित ) हप्ते बाकी आहेत अशा कर्मचाऱ्यांना सदर हप्ते अदा करण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता राज्य शासनाकडून करण्यात येणार आहेत .
पण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !