Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme praniti shinde questions] : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता ,  या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले . या उत्तराने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मिळावी या मागणी करिता बऱ्याच दिवसापासून अनेक आंदोलने , मोर्चे काढण्यात  आले आहेत . यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन देण्यात आले असून , याबाबत विधानसभेत निर्णय देखील घेण्यात आला आहे . परंतु याबाबत अधिकृत अधिसूचना /  शासन निर्णय निर्गमित झालेले नाही.

तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्वपूर्ण आहे जुनी पेन्शनच्या मागणी करिता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने , मोर्चे तसेच केंद्र सरकारला वारंवार निवेदने दिले आहेत .  याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे ?  किंवा केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कधी होईल ?  याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे संसदेत प्रश्न उपस्थित केला असता ..

केंद्र सरकारकडून याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले . या लेखी उत्तरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे .

यामुळे बऱ्याच दिवसापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे . सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच पेन्शन बाबत समिती गठीत करणे , अहवाल मागवणे अशा प्रकारचे काम केले जाते . परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे यावरून दिसून येते .

यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना मागणी करिता पुन्हा एकदा आंदोलन , मोर्चे काढण्याचे संकेत सरकारला दिले आहे . देशातील सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा दिल्ली येथे महामोर्चा काढणार असल्याचे संघटनेमार्फत माहिती देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *